J Krishnamurty Anantas Patre
प्रिय अनंता,
तुझ्याकडे जीवन नावाची एक अतिशय असामान्य अशी गोष्ट आहे. या जीवनात सर्वत्र दुःख, आनंद, अपराधीपणा, वेदना, एकटेपणा आणि अमर्याद सौंदर्य भरलेले आहे. ज्याच्या नावातच अनंतत्व आहे, विशालत्व आहे, अमितता आहे, जो ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करतो आहे, जो एक उत्तम सतार वादक आहे, कवी आहे ...
असे असूनही त्याच्या वाट्याला वैफल्यग्रस्तता आली आहे. मी तर म्हणेन की, या व्यथेचाच तू शोध घ्यायला हवास ! तू सुसंस्कृत, संवेदनशील असा कलावंत आहेस, मग असे का व्हावे ? मला तुझी खूप काळजी वाटते अनंता ! म्हणूनच ही पत्रे ! या पत्रांतून 'स्व' चा शोध, सांपत्तिक-मानसिक वारसा, आपल्या आतच विराजमान असलेला ईश्वर, स्वतःच स्वतःसाठी प्रकाश होणे, संपूर्ण चांगुलपणातले जगणे, परिवर्तनाची निकड़, प्रामाणिकपणा, एकटेपण आणि एकाकीपण, प्रेमस्पर्श, भीती, आशा-निराशा, सुख आणि समाधान, परस्पर संबंधातील ताण-तणाव, इच्छा हेच दुःखाचे मूळ, कामना आणि क्रोध, अहमपासून मुक्ती, दुःख़ाची सुबुद्ध सोबत, निसर्गाशी मैत्री, संघर्ष, तसेच मृत्यू : जगण्याचा सोहळा, ध्यानाचे सौंदर्य अशा एक ना अनेक विषयांचे आमच्या गुरुजींनी, म्हणजेच जे. कृष्णमूर्तींनी केलेले विचार मंथन गुंफलेले आहे. हे सारे तू काळजीपूर्वक वाच! मुख्य म्हणजे झालेले आकलन त्वरित अंमलात आण ! तरच परिवर्तन शक्य होइल !
डॉ. कमलेश सोमण