
Mein Kampf (Marathi) | माझा लढा
- No of Pages: 424
- Binding: Hardcover
चित्रकला तथा शिल्पकलेची आवड व जाण असणार्या अॅडॉल्फचा ‘स्व’भाव, पौगंडावस्थेतील त्याची जडण-घडण, आपल्या मुलाला कारकून बनविण्यासाठी पछाडलेल्या बापाबद्दल त्याला वाटणारी चीड, आईच्या मृत्यूनंतर आपले पोरकेपण उराशी घेत भूक-गरीबी यांची पर्वा न करता व्हिएन्ना-म्युनिच शहरातील त्याने केलेली जीवघेणी वणवण, पुढे कामगार-मजूरवर्ग, ज्यू-मार्क्सवाद तसेच शहरातील बुर्झ्वा मंडळी तसेच समकालीन राजकीय पक्ष यांच्या विषयी बनलेल्या ठाम भूमिका आणि युद्धात जर्मनीच्या पराभवानंतर अखेर राजकारणात प्रवेश करण्याचा त्याने घेतलेला निर्णय...अशा एक ना अनेक गोष्टी ‘माझा लढा’च्या पहिल्या भागात आपल्याला पहावयास मिळतात. दुसर्या भागात अॅडॉल्फची समग्र विचारधारा, त्याची स्वप्ने तसेच नव्याने स्थापन केलेल्या ‘नॅशनल सोशॅलिस्ट जर्मन लेबर पार्टी’ची ध्येय-धोरणे तसेच पार्टीचा विकास-प्रचार आणि पक्षाची बांधणी, कामगारांचे प्रश्न अशा एक ना अनेक गोष्टींबद्दलची हिटलरची मते-दृष्टी विलक्षण थेट आणि धीटपणे व्यक्त होताना दिसते. सर्वात महत्वाचे म्हणजे, नंतरच्या वीस-पंचवीस वर्षात आपल्याला काय करायचे आहे, याची एक निश्चित योजना-आराखडा हिटलरकडे होता.
‘कालव्हिन यांचा ‘इन्स्टिट्यूटस’, मार्क्सचा ‘कॅपिटल’ किंवा अॅडम स्मिथचा ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या सर्वांच्या पंक्तीत अॅडॉल्फ हिटलरच्या ‘माइन काम्फ’चा समावेश जॉर्ज बर्नार्ड शॉ मोठ्या सन्मानाने करतात. कारण तो त्यांना तितक्याच तोडीचा आणि युगप्रवर्तक वाटतो. ‘माईन काम्फ’ हे पुस्तक नाझीवादाची आचारसंहिता असूनही कुणाही मुत्सद्याला त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही, याचे ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ या बृहद ग्रंथाचे लेखक वि. ग. कानिटकर यांना विलक्षण आश्चर्य वाटते.