Awaken The Giant Within (Marathi)
तुमचे आयुष्य हे तुमच्या ताब्यात आहे?
तुमच्या नियंत्रणातून कोणत्या गोष्टी निसटून जात आहेत?
अनलिमिटेड पॉवर चे कर्ते अँथोनी रॉबीन्स वाचकाला आपल्या मानसिक, भावनिक, भौतिक आणि आर्थिक क्षेत्रांवर नियंत्रण कसे मिळवले पाहिजे, हे सहजतेने पण नेमकेपणाने दर्शवतात.
अवेकन द जायंट विदिन मध्ये अतिशय तीक्ष्ण व मर्मग्राही अशा स्वरुपाचे निष्कर्ष रॉबीन्सने नोंदवले आहेत. इतकेच नव्हे तर अनेक गोष्टींवर-मुद्यांवर लेखकाने मोठ्या अंतर्दृष्टीतून प्रकाश टाकला आहे. खरे यश हे जीवनमूल्यांची बांधिलकी आणि अवतीभोवतीच्या वेदनाग्रस्त-दुःखी जगताची सेवा यातूनच मिळू शकते,
ही प्रगल्भ जाणीव प्रस्तुतच्या ग्रंथातून त्यांनी अधोरेखित केली आहे.
स्टीव्हन कोवे
आनंदाची कास धरुन वाचकाला यशवैभवाप्रत कसे घेऊन जायचे हे लेखकाला नेमकेपणाने कळले आहे. अवेकन द जायंट विदिन मधून आपल्याला लेखकाची जगाविषयीची अद्भूत समज व एक नवे शहाणपण लक्षात येते. मानवी स्वभावाचे स्वरूप आणि अवतीभोवतीच्या माणसातून त्याला त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शन करण्याची प्रेरणा मिळते.