How I Made 2 Million in the Stock Market (Marathi) | मी शेअर बाजारात दोन मिलियन डॉलर्स कसे मिळवले
'मी शेअर बाजारात दोन मिलियन डॉलर्स कसे मिळवले?' हे अतिशय विलक्षण पुस्तक आहे. ते शेअरबाजाराच्या इतिहासातील एक असामान्य यशोगाथा सांगते.
निकोलस दर्वास हे कोणी शेअरबाजारातील अंतर्गत माहितीवर आधारित व्यवसाय करणारे व्यवसायिक नव्हते, तर ते सर्वोच्च पगार मिळवणारे देखण्या व्यवसायातील एक नर्तक होते. तरीही त्यांनी स्वतःला कित्येक वेळा मिलिनॉयर बनवले, ते गुंतवणुकीविषयीच्या इतर तथाकथित कार्यपद्धतींच्या ऐवजी त्यांच्या एकमेव "गुंतवणूक-दृष्टिकोनामुळे'. शेअरबाजार तेजीचा आहे का मंदीचा, याची पर्वा न करता त्यांनी काम केले.
जेव्हा त्यांच्या आश्चर्यजनक नफा आणि कार्यपद्धती यांच्या बातम्या येऊ लागल्या, तेव्हा त्यांच्यावर 'टाईम' मासिकात खास लेख आला. मग त्यांचे मन हे पुस्तक लिहिण्याकरिता वळवण्यात आले. हे पुस्तक अल्पावधीतच सर्वाधिक खपाचे पुस्तक झाले. आठ आठवड्यांत या पुस्तकाच्या २ लाख प्रती विकल्या गेल्या.
या पुस्तकात ज्यांचा उल्लेख आहे, अशा अनेक कंपन्या आता अस्तित्वात नाहीत. तरीही, यातील मूलभूत तत्त्वे आजही तितकीच भक्कम आहेत.