Kanyakumari Cycle Safaracha Smrutgandh | Kanyakumari to Pune and Back Cycle Ride
Goel Prakashan

Kanyakumari Cycle Safaracha Smrutgandh | Kanyakumari to Pune and Back Cycle Ride

Regular price Rs. 120.00 Rs. 120.00 Unit price per
Free Shipping

'कन्याकुमारी सायकल सफरीचा स्मृतिगंध' हा सतीश कुलकर्णी यांचा प्रवास वर्णन वाचण्यात आला. ३६ वर्षांपूर्वी केलेला पुणे -कन्याकुमारी -पणे सायकल प्रवास खूप शिकवणारा आहे. प्रवास वर्णलात आलेल्या सर्वच गोष्टी नवीन सायकल प्रवास करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत.

पुस्तकात दाखवलेले नियोजन, केलेली अंमलबजावणी, युवकांमधील स्वंयमशिस्त दाखवते. प्रवासात असतांना सर्वांना सोबत घेऊन जाणे, निसर्गातील प्रत्येक कणाकणांचा अन क्षणाक्षणांचा आनंद घेत केलेला पुणे कन्याकुमारी पुणे सायकल प्रवास, ६ राज्य ४५०० किलोमीटर आणि ३७ दिवस हे सर्व नियोजन प्रेरणादायी तर आहेच. परंतु आगामी काळात अशी सायकल मोहिम राबवणाऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल. स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरीत होऊन केलेली पुणे - कन्याकुमारी - पुणेनं सायकल प्रवास वाचतांना आपणच सायकल चालवतोय ! असे वाटत होते. सतीश कुलकर्णी यांनी शब्दांकित केलेले 'कन्याकुमारी सायकल सफरीचा स्मृतिगंध' सर्वांनाच वाचनीय असाच आहे.

विश्वास लपालकर संघटक महाराष्ट्र प्रांत विवेकानंद केंद्र - कन्याकुमारी


Share this Product