Meditations
Goel Prakashan

Meditations

Regular price Rs. 250.00 Rs. 250.00 Unit price per
Free Shipping
अँटोनिनसने आपल्या उत्तराधिकार्‍यासाठी संपूर्ण चांगुलपणात जगणारा सम्राट मार्कस ऑरिलियस याला नियुक्त केले. या सम्राटालाही पुढे सर्वोत्कृष्ट सार्वभौम म्हणून प्रतिष्ठा मिळाली, तोही प्रसिद्धीच्या बाबतीत अँटोनिनससारखा उदासीन होता. त्याचा प्रत्यक्ष कार्यावर व कर्तुत्त्वावर अधिक विश्वास होता. ऑरेलियसने अ‍ॅटोनिनसच्या पावलावर पाऊल ठेवत, त्याचा आदर्श सांभाळत साम्राज्यपद निभावले. प्रजाजनांच्या मनात स्वतःची जागा ऑरेलियसने निर्माण केली. प्रतिस्पर्ध्याची हत्या न करणारा मार्कस ऑरेलियस आयुष्यभर स्वतःशी पूर्णपणे वचनबद्ध राहिला. मार्कस ऑरेलियस निरहंकारी तर होताच, पण तो ऑटोनिनससारखा प्रलोभनापासून संपूर्ण मुक्त होता. स्तूती आणि निंदा या दोहोंकडे तो सारख्याच नजरेने पाही! मार्कस ऑरेलियसच्या कारकीर्दीत दुष्काळ, रोगराई यांसारख्या नैसर्गिक आपत्ती आणि रानटी टोळ्यांचे हल्ले यांनी लोक हतबल झाले होते. तथापि गरिबांचा कर कमी करुन आणि त्यांना धान्यादी वस्तू वाटून त्याने मदत केली. ग्लॅडिएटरच्या खेळातील क्रूरपणा त्याने कमी केला. तो वक्ता, कायदेपंडित, तत्त्ववेत्ता आणि लेखक होता. त्याचा स्टोईक तत्त्वज्ञानावरील ‘मेडिटेशन’ हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. मार्कस ऑरेलियस यांनी आपल्या ‘मेडिटेशन’ या ग्रंथात अर्थपूर्ण जगण्याची एक सर्वसमावेशक व शहाणी नियमावली आणि काही संकेत नमूद केले आहेत. ते अत्यंत प्रगल्भ व परिपक्व आहेत. इतकी शतके होऊनही मार्कस ऑरेलियसची तत्त्वे आजही तितकीच मूलगामी व सर्वव्यापी वाटतात.

Share this Product