Samagra Anni Samrudh Vyaktimatva Vikasakade
Goel Prakashan

Samagra Anni Samrudh Vyaktimatva Vikasakade

Regular price Rs. 250.00 Rs. 250.00 Unit price per
Free Shipping

आपल्यापैकी प्रत्येक जण संपूर्णपणे मानसिक, आंतरिक व आध्यात्मिक परिवर्तन पावत असेल, तर आपणा सर्वांना नवीन जग खात्रीने निर्माण करता येईल व्यक्तिमत्वाचे-जीवनाचे अंतर्बाहा विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व अंगाची-घटकांची जोपासना करणेच असते. मेंदूची मनाची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्व देता आले पाहिजे. तसेच जीवनाच्या (अंतर्बाह्य) सर्व अंगोपांगांची एकात्मता आपल्याला साधता आली पाहिजे. व्यक्तिमत्व या शब्दात व्यक्ती हा शब्द फार महत्वाचा आहे. जी आपल्या आत दडलेली चैतन्यशक्ती, आनंदातील कृती, हृदयातील सखोल, समृद्ध व स्वतंत्र जीवनाशय व दृष्टी एका आंतरिक रेट्यातून पण शुद्ध मनाने व बुद्धीने मोठ्या निर्भयपणे व्यक्त करते... ती खरी व्यक्ती !

जीवनाच्या, व्यवसायाच्या तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या प्रवासात यशस्वी कसे व्हायचे, हे अनकेदा आपल्याला माहितच नसते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपण आपल्यातल्या चतैन्याचा सर्वस्वाने कधी वेधच घेत नाही. दुसरे असे की, आपल्याला नक्की काय करावेसे वाटते, हे ओळखणे फार फार महत्त्वाचे आहे. कारण ते नेमकेपणाने ओळखणे, हीच अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते. एकू णच, आपल्याला अस्तित्त्वानिशी काय करायला आवडते ते शोधून काढा! अन्यथा ज्या कामात-प्रान्तात तुम्हाला मुळीच रस-रूची नसेल, ते काम तुम्हाला करायला लागेल. मग तुमचे जीवन दुःखी होऊन जाईल. तुमच्या अंतरंगात आनंद नसेल, तर जीवनाला फार थोडा अर्थ आहे. अर्थात हा अर्थ हा आपल्या जिव्हाळ्याच्या विषयात वा प्रान्तात सर्वस्वाने उतरण्यात व पाऊल पाऊल पुढे जाण्यात आहे.

समग्र आणि समृद्ध व्यक्तिमत्व विकासाच्या शिखरावर आरुढ व्हायचे असेल तर मुक्ततेच्या वाटेत येणाऱ्या अडथळ्यांवर आपल्याला मात करावीच लागेल.


Share this Product