Shivcharitra: Bhav Anni Aashay | शिवचरित्र (भाव आणि आशय )
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे; तर अवघ्या देशाच्या प्रेरणेचा विषय आहेत. शिवाजी
महाराजांच्या चरित्राचा आणि तत्कालीन घटनांचा सहज आणि सोप्या भाषेत आढावा
घेण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहॆ. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वभावधर्म,
शाहजीराजे यांचे कार्य, स्वराज्यस्थापनेचा सुरुवातीचा काळ, त्या वेळी आलेल्या अडचणी आणि
त्यावर महाराजांनी कशा प्रकारे मात केली, यांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहॆ.
बिकट प्रसंगी शिलेदारांनी दाखवलेली निष्ठा, त्याग आणि बलिदान या साऱ्या गोष्टींमुळे
शिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेत यश आले, हे शिवचरित्राचे अंतरंग समजून घेणे गरजेचे
आहॆ.
शिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक म्हणजे, मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाची
घटना. या घटनेने अनेकांना स्वतंत्र राज्यस्थापनेसाठी प्रेरणा दिली, आणि परकीय सत्तेला
आव्हानही दिले. आजचा भारत देश, महाराष्ट्राचा स्वाभिमान, आणि हिंदू संस्कृती अबाधित
राखण्याचे कामही शिवाजी महाराजांनी केले. या सर्वांचा वेध घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन
करणे गरजेचे आहॆ.