{"title":"Marathi Home Page","description":null,"products":[{"product_id":"think-and-grow-rich-marathi-marathi","title":"Think and Grow Rich Marathi (Marathi)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eतुमचे मन, तुमचे विचार हेच तुमचे खरे भांडवल आहे. मनात योग्य विचारांचीच भरती करा योग्य विचार, योग्य ठिकाणी तुम्हाला करता आला पाहिजे. भीती, स्वतःबद्दल वाटणारी अनुकंपा, देश- मत्सर तसेच न्यूनगंड किंवा पराकोटीचा असंतोष व साचलेला क्रोध या सगळ्या नकारात्मक भावना आहेत. तुम्ही अत्यंत तरल सावधानतेने या नकारात्मक भावना ओळख करायला हवे. आपले मन जरी चंचल असले तरी ती ते एखाद्या सुंदर संकल्पनेचा पाठपुरावा प्राणपणाने करू शकते. या मनाचा दृढ विश्वास त्याला सावरायला समृद्ध व श्रीमंत बनवत असतो. Action is the real measure of intelligence नेपोलियन हिल\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":37986305573057,"sku":"9788194116875","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/products\/front_new.jpg?v=1669211072"},{"product_id":"the-power-of-your-subconscious-mind-marathi-marathi","title":"The Power of Your Subconscious Mind Marathi (Marathi)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआपल्या अंतर्मनाची क्षमता व ताकद खरोखरीच अफाट असते. आपण जर मनाच्या एका शांततेत पूर्ण प्रेमाने आणि अगदी हळूवारपणे आपल्या अबोध-सुप्त मनाशी संवाद साधला आणि त्याला योग्य सकारात्मक व संभाव्य सूचना दिल्या, तर सारे काही आपल्या मनासारखे घडू शकते. मुख्य म्हणजे, आपण आपल्या भयावर वा न्यूनगंडावर मात करू शकतो. आपले अबोध-अंतर्मन हे आपल्या संवादानुसार-सूचनेनुसार मोठ्या आज्ञाधारकरीतीने विचार-वर्तन करीत असते. आपल्या सूचना या नेणिवेच्या तळापर्यंत जातात आणि तिथेच त्याचा कोंभ रुजतो. पुढे त्याला काही दिवसातच अंकूर फुटतात. आपले अंतर्मन आणि आपले बाह्यमन यात समतोल, सहयोग आणि संवाद सतत राहू द्या! डॉ जोसेफ मर्फी\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":37986849292481,"sku":"9788194116882","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/products\/front-new_8aaacdfd-5295-438c-a9ec-a5d55feaa2bf.jpg?v=1669210431"},{"product_id":"chanakya-neeti","title":"Chanakya Neeti","description":"\u003cp\u003eचंद्रगुप्त मौर्याचा महामात्य, ‘अर्थशास्त्र’ तसेच ‘चाणक्यनीति’ सूत्रांचा कर्ता चाणक्य, हा विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही प्राचीन भारतीय इतिहास, राजनीती आणि संस्कृती विषयक वाङ्मयात ओळखले जातात. \u003cbr\u003eकुशाग्र बुद्धी, बहुविध ज्ञान, प्रदिर्घ अनुभव यांच्या आधारावर निर्भीड विचारवंत, समर्थ अमात्य, हुशार आणि धूर्त राजकीय विचारवंतांचे आणि कृतिवीराचे उदाहरण इतिहासात क्वचितच आढळेल. पूर्वसूरींच्या विचारांची दखल घेत, स्वतःची वेगळी मते तर्कशुद्ध पद्धतीने मांडून, नवीन चाणक्यनीति व्यक्त करणारा, थोर प्राचीन भारतीय प्रज्ञावंत म्हणजे चाणक्य ऊर्फ कौटिल्य होय!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cbr\u003eभारतात त्या काळी एकटे मगध साम्राज्य विस्ताराने मोठे होते. परंतु तेही नंदराजाच्या नाकर्तेपणामुळे दुर्बल झाले होते. शेवटचा धनानंद हा धनलोभी आणि जुलमी होता. अशा स्थितीत भारतात शक्तिशाली मध्यवर्ती एकछत्री सत्ता निर्माण करणे, ही त्या काळाची गरज होती.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रस्तुत ग्रंथात आचार्यांची संपूर्ण चाणक्यनीति (चाणक्यसूत्रांसह) विस्ताराने अन्ययार्थासह विशद करण्याचा नम्र प्रयत्न मी केला आहे. रोजच्या जीवनाच्या चक्रात तसेच मोक्षाप्रत जाऊ पाहणार्या मनुष्याला आचार्य आईच्या ममतेने शहाणपणाच्या व समजूतदारपणाच्या काही मौलिक सूचना करतात. मुळातच द्रष्ट्या चाणक्यांचे विचार हे अत्यंत प्रगल्भ आणि विलक्षण प्रभावी आहेत. मुख्य म्हणजे, आजच्या २१व्या शतकाच्या तिसर्या दशकातही चाणक्यनीति तितकीच उपयुक्त असून, व्यक्तीत आमूलाग्र परिवर्तन घडून आणणारी आहे. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":41357680771265,"sku":"","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/products\/Chanakyaneeti_Front_f0bfe794-be49-442b-8ee0-10eed5272cc9.jpg?v=1669211003"},{"product_id":"trading-in-the-zone-marathi-mark-douglas","title":"Trading in the Zone (Marathi) | ट्रेडिंग इन द झोन","description":"\u003cdiv\u003eतुम्हाला शेअर बाजाराबद्दल भरपूर माहिती असेल! तुम्हाला कदाचित शेअर बाजारातील महत्त्वपूर्ण खेळाडू ज्ञात असतील! शेअर कधी खरेदी करावेत आणि कधी विकावेत याचे ज्ञान देखील असेल! बाजारातील स्थिती-गती नेमकेपणाने माहिती आहे, असे तुम्हाला वाटत असेल! पण तुम्हाला तुमची स्वतःची ओळख आहे का?\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e  \u003cbr\u003eखूप मुरलेले शेअर ट्रेडर्सदेखील काही वेळा त्यांच्या नकारात्मक विचारप्रणालीमुळे चुकीचे निर्णय घेतात. मानसिक असक्षमतेमुळे परिपूर्ण माहिती असून देखील ते त्यांच्या योजना यशस्वीरित्या राबवू शकत नाहीत. अती आत्मविश्वासामुळे ते शेअर बाजाराबद्दल चुकीच्या समजूती मनात विकसित करतात. परिणामतः मोठ्या तोट्याला ते सामोरे जातात. \u003cbr\u003eमार्क डग्लस, अध्यक्ष ट्रेडिंग बिहेविअर डायनॅमिक्स या त्यांच्या कंपनीद्वारे गेली वीस वर्षे शेअर ट्रेडर्समध्ये योग्य मानसिकता विकसित करीत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून ते त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त व अजिंक्यतेच्या विचारधारा रुजवत आहेत. शेअर ट्रेडर्सची मानसिकता ही त्यांच्या बाजाराच्या विश्लेषणापेक्षा खूप महत्त्वाची आहे, असे मार्क यांना वाटते. यशस्वीतेच्या झोनमध्ये व्यापार करणे आणि बाजारातील विविध शक्यतांचा अभ्यास करणे हे मार्क डग्लस यांना खूप महत्त्वाचे वाटते.  \u003cbr\u003e\u003cbr\u003eट्रेडिंग इन द झोन मध्ये डग्लस, ट्रेडर्स सातत्याने फायदेशीर नसण्याची मूलभूत कारणे शोधून काढतात. ते ट्रेडर्सना खोलवर रुजलेल्या अयोग्य मानसिक सवयींवर मात करण्यास मदत करतात. डग्लस बाजारपेठेच्या मिथकांचा पर्दाफाश करतात. ट्रेडर्सना बाजारातील यादृच्छिक परिणामांच्या पलीकडे पाहण्यास, जोखमीची खरी वास्तविकता समजून घेण्यास आणि सर्व स्टॉक अनुमानांवर नियंत्रण ठेवणार्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचे मार्गदर्शन करण्यास शिकवतात. ट्रेडिंग इन द झोन बाजाराला नवीन मानसिक परिमाणाची ओळख करून देतो. अभूतपूर्व नफ्यासाठी  ट्रेडिंग इन द झोनच्या शक्तीचा फायदा करून घ्या.\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cbr\u003eमार्क डग्लस हे १९९० मध्ये प्रकाशित झालेल्या ’द डिसिप्लिन्ड ट्रेडर : डेव्हलपिंग विनिंग अॅटिट्यूड्स’ या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी ’ट्रेडिंग सायकोलॉजी’ या संकल्पनेशी गुंतवणूक उद्योगाची ओळख करून दिली. मार्कने १९८२ मध्ये ट्रेडर्सना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि गुंतवणूक उद्योग, तसेच वैयक्तिक ट्रेडर्ससाठी ट्रेडिंग सायकॉलॉजी या विषयावर चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे सुरू ठेवले आहे. ते जगभरातील, तसेच अमेरिकेतील या विषयावरील चर्चासत्रांमध्ये  वक्ते म्हणून काम करत आहेत. ट्रेडर्सना सातत्याने यशस्वी कसे व्हायचे ह्याची शिकवण ते अविरतपणे देत आहेत. सध्या ते त्यांच्या तिसर्या पुस्तकावर काम करत असून, त्याबद्दलची माहिती तुम्ही त्यांच्या ुुु.ारीज्ञर्वेीसश्ररी.लेा या संकेतस्थळाच्या माध्यमातून घेऊ शकता।\u003c\/div\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":41834852843713,"sku":"9789393624024","price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/products\/front_a3ebcc45-e31f-4c53-8268-9d20ad2559c0.jpg?v=1660131064"},{"product_id":"discipline-is-destiny-marathi","title":"Discipline is Destiny (Marathi)| डिसिप्लिन इज डेस्टिनी","description":"\u003cp\u003eस्वयंशिस्तीशिवाय संयम, धैर्य, न्याय आणि शहाणपण हे चार सद्गुण प्रत्यक्ष जीवनात अवतरणे केवळ अशक्य आहे. म्हणूनच स्वयंशिस्तीला अपार महत्त्व आहे. खरे तर स्वयंशिस्त हाच सद्गुण आहे आणि सद्गुण हीच स्वयंशिस्त! लू गेह्रिगपासून मार्कस ऑरेलियस, क्वीन एलिझाबेथ, जॉर्ज वॉशिंग्टन, मार्था ग्रॅहम, हॅरी ट्रुमन, जॉयस कॅरोल ओट्स, बुकर टी. वॉशिंग्टन, फ्लॉइड पॅटरसनपर्यंत ज्या महान व्यक्तींच्या महानतेचे दर्शन आपण घेतले. त्यांनी स्वयंशिस्तीसह वरील चार सद्गुणांची संयमासह सहनशक्तीची कास धरली. एकूणच, एक अखंड, एकजिनसी, सुसंवादी माणूस हा या चार सद्गुणांच्या उपासनेतून उदयाला आलेला असतो. आत्मनियंत्रणातून तसेच विचारपूर्वक आणि पूर्वनियोजनाने वरील चार सद्गुणांच्या  दिशेने व दृष्टीने एकेक पाऊल पुढे जात राहणे, हे एक प्रकारे श्रेष्ठत्त्वाकडे जाणेच असते.  जगद्विख्यात जर्मन महाकवी गटे ह्याने रचिलेल्या नाट्यकाव्यात, ‘फाउस्ट’मध्ये म्हणतो,\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":42043325120705,"sku":"9789393624307","price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/products\/front_e663fff0-ae49-40a0-9833-b0e9678a7258.jpg?v=1664867717"},{"product_id":"shivcharitra-bhav-anni-aashay-शिवचरित्र-भाव-आणि-आशय","title":"Shivcharitra: Bhav Anni Aashay | शिवचरित्र (भाव आणि आशय )","description":"\u003cp\u003eशिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्याच नव्हे; तर अवघ्या देशाच्या प्रेरणेचा विषय आहेत. शिवाजी\u003cbr\u003eमहाराजांच्या चरित्राचा आणि तत्कालीन घटनांचा सहज आणि सोप्या भाषेत आढावा\u003cbr\u003eघेण्यासाठी हे पुस्तक लिहिण्यात आले आहॆ. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, मराठ्यांचा स्वभावधर्म,\u003cbr\u003eशाहजीराजे यांचे कार्य, स्वराज्यस्थापनेचा सुरुवातीचा काळ, त्या वेळी आलेल्या अडचणी आणि\u003cbr\u003eत्यावर महाराजांनी कशा प्रकारे मात केली, यांचा आढावा या पुस्तकातून घेण्यात आला आहॆ.\u003cbr\u003eबिकट प्रसंगी शिलेदारांनी दाखवलेली निष्ठा, त्याग आणि बलिदान या साऱ्या गोष्टींमुळे\u003cbr\u003eशिवाजी महाराजांना स्वराज्यस्थापनेत यश आले, हे शिवचरित्राचे अंतरंग समजून घेणे गरजेचे\u003cbr\u003eआहॆ.\u003cbr\u003eशिवाजी महाराजांचा झालेला राज्याभिषेक म्हणजे, मध्ययुगीन कालखंडातील अत्यंत महत्त्वाची\u003cbr\u003eघटना. या घटनेने अनेकांना स्वतंत्र राज्यस्थापनेसाठी प्रेरणा दिली, आणि परकीय सत्तेला\u003cbr\u003eआव्हानही दिले. आजचा भारत देश, महाराष्ट्राचा स्वाभिमान, आणि हिंदू संस्कृती अबाधित\u003cbr\u003eराखण्याचे कामही शिवाजी महाराजांनी केले. या सर्वांचा वेध घेण्यासाठी या पुस्तकाचे वाचन\u003cbr\u003eकरणे गरजेचे आहॆ.\u003c\/p\u003e\n\u003c!----\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":48340495368385,"sku":"9789393624901","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/files\/Shivacharitra_FrontCover.jpg?v=1717760498"},{"product_id":"emotional-intelligence-marathi-daniel-goleman","title":"Emotional Intelligence (Marathi) Daniel Goleman","description":"\u003cp\u003e\u003cimg src=\"https:\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/files\/75197219cb0da0c45ebdb03ff17dddd8.jpg?v=1753797965\" alt=\"\" width=\"187\" height=\"63\"\u003e\u003ca href=\"https:\/\/www.amazon.in\/Emotional-Intelligence-Marathi-Daniel-Goleman\/dp\/9393624747\/\" target=\"_blank\" title=\"Buy Emotional Intelligence in Marathi on Amazon\" rel=\"noopener\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e‘स्व’भावनांची यथायोग्य जाणीव होणे, स्वत:ची व इतरांचीही आंतरिक मन:स्थिती ओळखता येऊन भावभावनांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. स्वत:च्या भावनांवर आणि त्यांच्या अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवता येणे, आपल्या जवळील व्यक्तींसोबत सुसंवाद साधता येणे, स्वयं-प्रेरणेतून व जीवनात ठरविलेल्या उद्दिष्टांनुसार कार्य करणे, वागण्यात व स्वभावात लवचीकपणा असणे या सर्व गुणात्मक मिश्रणाला भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात. विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे ;भावनिक बुद्धिमत्ता होय. कोणत्याही व्यक्तीची भावनांचा वापर करून संवाद साधण्याची, घडलेल्या व केलेल्या सर्व घडामोडी स्मरणात ठेवण्याची, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करण्याची, एखाद्या घटनेतून बोध\u003cbr\u003eघेण्याची, इतरांचे मत समजून घेण्याची, व्यक्तींना पारखण्याची, तसेच भावना समजून सांगण्याची आंतरिक क्षमता म्हणजेभावनिक बुद्धिमत्ता होय. ज्या विद्यार्थ्यामध्ये वा व्यक्तीमध्ये भावनिक बुद्धिमत्ता सुदृढ असते, तो जीवनात यशस्वी व समाधानी असतो. त्यांच्यात आनंद, परिपूर्णता, स्वायत्तता, स्वतंत्रता, स्व-नियंत्रण, मैत्री, जागरूकता, प्रशंसा, मानसिक शांतता, इच्छा, समाधान\u003cbr\u003eअशा अनेक भावनांचा निरोगी समतोल दिसून येतो. आनंदी व गुणवत्तायुक्त जीवन जगण्याकरिता उच्च भावनिक बुद्धिमत्ता तयार करणे नितांत गरजेचे असते.\u003c\/p\u003e","brand":"Goel Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":49359009710273,"sku":"9789393624741","price":299.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0532\/2162\/1953\/files\/EmotionalIntelligence__Front.jpg?v=1750682814"}],"url":"https:\/\/www.goelprakashan.com\/collections\/marathi-home-page.oembed","provider":"Goel Prakashan","version":"1.0","type":"link"}