Lokmanya Tilak: Jeevanpravas anni Vichardhara
Lokmanya Tilak: Jeevanpravas anni Vichardhara
Goel Prakashan

Lokmanya Tilak: Jeevanpravas anni Vichardhara

Regular price Rs. 250.00 Rs. 225.00 Unit price per
Free Shipping
स्वराज्याच्या लढ्यातील एक शस्त्र म्हणून प्रथम शिक्षणसंस्था काढण्यास टिळक प्रवृत्त झाले. भारत हे खर्‍या अर्थाने राष्ट्र म्हणून घडविण्यासाठी राष्ट्रीय भूमिकेतून शिक्षण दिले गेले पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. इतकंच नाही तर शिक्षणातून कर्तव्यदक्ष आणि बहुश्रुत असे नागरिक निर्माण करीत असतानांच उच्चतम ज्ञानाची उपासना करणारे पंडितही घडविले गेले पाहिजेत, असं ते म्हणत! या दृष्टीने इंग्रजी भाषेचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. मात्र राष्ट्र म्हणून भारताने देवनागरी लिपीतील हिंदी भाषेचा राष्ट्रभाषा म्हणून स्वीकार करावा आणि मातृभाषेच्या माध्यमातून शिक्षण घेण्याच्या दृष्टीने अधिकाधिक प्रयत्नीशील रहावे, अशीही मते त्यांनी व्यक्त केलेली आढळतात.
लोकमान्य हे ग्रंथकार होते, तसेच थोर संपादकही होते. पत्रकाराने सामान्य लोकांवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडावी व प्रसंगी त्यासाठी देहदंड सोसावा, अशी त्यांची पत्रकार म्हणून भूमिका होती आणि तसा त्यांनी तो सोसलाही होता.

असामान्य बुद्धिमत्तेच्या या लोकोत्तर पुरुषाला वस्तुतः गणित, तत्त्वज्ञान, इतिहास संशोधन अशा विद्वत्तेच्या क्षेत्रात अधिक रस होता. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला गीतारहस्य हा मराठी ग्रंथ आणि इंग्रजीतील द ओरायन आणि आर्क्टिक होम इन दि वेदाज या ग्रंथावरुन त्याची साक्ष पटते. परंतु कर्तव्यबुद्धीनेच त्यांनी आपले आवडीचे विषय बाजूला ठेवून आणि सर्व प्रकारचा स्वार्थत्याग करुन, हालअपेष्टा व देहदंड सोशीत स्वराज्याच्या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. स्वराज्याच्या पुढील लढ्याची तयारी त्यांनी इ.स.१९२०  पर्यंत करून ठेवली होती. ते मुंबई येथे १ ऑगस्ट १९२० रोजी निधन पावले. त्यांच्या राष्ट्रकार्यातून जगातील अनेक परतंत्र देशांना पारतंत्र्याविरुद्ध लढण्याची प्रेरणा मिळाली.


Share this Product