Goel Prakashan
Old Man and the Sea (Marathi) | द ओल्ड मॅन अँड द सी
Regular price
Rs. 199.00
Free Shipping
अर्नेस्ट हेमिंग्वे हा अमेरिकन दर्जेदार कादंबरीकार आणि कथाकार. १९५२ मध्ये द ओल्ड मॅन अँड द सी ही हेमिंग्वे यांची उत्कृष्ट कादंबरी प्रसिद्ध झाली. ती विलक्षण गाजली आणि लोकप्रियही झाली. ह्या कादंबरीला पुलित्झर पारितोषिकासह १९५४ मध्ये साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला. पुढे ही कादंबरी जगभर गाजली.
क्यूबाचा एक वयस्क, थकलेला कोळी, सँटियागो आणि एक प्रचंड मर्लिन मासा ह्यांची लढाई ह्या कादंबरीत लेखकाने दर्शवली आहे. सँटियागोचे जीवन हे अनंत ऊर्जेने व धैर्य-धाडसाने व्यापलेले आहे.
८४ दिवसात एकही मोठा मासा गळाला लागलेला नसूनही जिद्द न हारता, प्रत्येक दिवशी संपूर्ण नव्याने, एका मोठ्या आत्मविश्वासाने व आंतरिक दृढ निश्चयाने म्हातारा समुद्रात मच्छिमारीसाठी लाटांवर स्वार होतो. समुद्राच्या खूप आत आत गेल्यावर त्याच्या गळाला विशाल मर्लिन मासा लागतो. म्हातारा मर्लिनशी संघर्ष करतो. आयुष्यभरच्या सर्व अनुभवाने आणि सामर्थ्याने, तो संघर्ष करीत मर्लिनला तो आपल्या होडीला बांधतो. मर्लिन माशाची लांबी ही म्हातार्याच्या होडीपेक्षाही लांब असते.
परताना शार्क माशाची नजर होडीला बांधलेल्या मर्लिन माशावर पडते. आता शार्क माशाशी मोठ्या निकराने म्हातार्याला लढणे भाग पडते. शार्क, मर्लिनला संपूर्णपणे गिळंकृत करतो. उरतो फक्त त्याचा सांगाडा! बंदरावर परत आल्यानंतर, निराश सँटियागो झोपायला आपल्या झोपडीत जातो. या दरम्यान, त्याच्या बोटीला बांधलेला मर्लिन माशाचा सांगाडा पाहून इतर लोक थक्क होतात.
दुसर्या दिवशी तो थकलेला म्हातारा सँटियागो, मॅनोलिन सह पुन्हा नव्याने, मोठ्या आत्मविश्वासाने मच्छिमारीस निघतो.