Origin of Species (Marathi) | Nisargatil Jaticha Ugam | ओरिजिन ऑफ स्पेसीज | निसर्गातील जातींचा उगम
माणसांचा उगम व त्यांचा इतिहास यावर प्रकाश टाकला जाईल
चार्ल्स डार्विन हे निसर्गाचे अभ्यासक, भू-विज्ञानशास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ होते. त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. जीवांच्या सर्व जाती या एकाच पूर्वजाच्या वंशज आहेत, हा त्यांचा सुप्रसिद्ध सिद्धांत विज्ञानाची पायाभूत संकल्पना आहे.
जीवसृष्टीच्या भौतिक परिस्थितीचा परस्पर-संबंध याविषयीचे रूढिप्रिय विचार आणि कल्पना किंवा विशास यांना आव्हान देणारा सिद्धांत या पुस्तकातून ते मांडतात. गुंतागुंतीचे व क्लिष्ट असे जातींचे एकमेकांवरील, तसेच सभोवतालच्या परिस्थितीवरील किंवा वातावरणावरील परस्परावलंबन या पुस्तकातून उघड होते.
ऑन द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक जेव्हा प्रसिद्ध झाले, तेव्हा त्यासंबंधी खूपच विवाद होते व आजही ते तसेच आहेत. परंतु हे पुस्तक काळाच्या ओघात सर्व कसोट्यांना उतरले आहे व मनुष्याच्या उत्क्रांतीसंबंधी शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यात अग्रगण्य ठरले आहे.
निसर्गप्रेमींसाठी या पुस्तकात डार्विनच्या इंग्रजी पुस्तकातील शास्त्रीय माहिती, निरीक्षणे आणि चर्चा शास्त्रीय परिभाषेत पण सोप्या व आकर्षक शैलीत मांडली आहेत. मराठी वाचकांच्या दृष्टीने डॉ. धनंजय केसकर यांचे निसर्गातील जातींचा उगम हे पुस्तक 'वैचारिक खजिना' आहे. - डॉ. माधव पेंडसे. (निवृत्त प्राचार्य. सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे )
'ऑरिजिन ऑफ स्पेसीज' या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! विज्ञान, विशेषतः उत्क्रांतीवादासारख्या गुंतागुंतीच्या विषयावर इतक्या अभ्यासपूर्ण पद्धतीने मराठी भाषेत लेखन करणे हे खरोखरच प्रशंसनीय आहे. -पद्म श्री व पद्म भूषण कुलपती प्रा.डॉ. शां. ब. मुजुमदार