
Shree Shambho Bharat
महाराष्ट्राचा इतिहास म्हणजेच 'छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जाज्वल्य पराक्रम' हे समीकरण प्रत्येकाच्या मनात रुजलेय. त्यांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, त्यांचा स्वराज्य-विचार आणि स्वराज्य - निष्ठा स्वतःमध्ये रुजवत छत्रपती संभाजी महाराज यांनी मातृभूमीसाठी आपल्या रक्ताचा थेंब न् थेंब अर्पण केला. अशा या शिवपुत्राची, म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयीची समग्र गाथा म्हणजे 'श्री शंभो-भारत' हे महाकाव्य होय.
यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भातला संपूर्ण इतिहास खरोखरच जसा घडला, तसाच वाचकांसमोर उलगडतो. विशेषत्वाने, 'जगातील पहिले उत्तरकालीन महाकाव्य' असा ज्याचा उल्लेख करता येईल, त्या महाकाव्यातून शंभुराजेंचा जयजयकार घराघरांत निनादेलच, परंतु त्याचबरोबर शंभू-विचार, शंभू भक्ती यांमध्ये वाचक तल्लीन होतील. त्यायोगे समाजामध्ये आदर्श पिढी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, इतकी प्रचंड ताकद या ग्रंथात आहे.
म्हणूनच, लेखकाच्या तळपत्या लेखणीतून उतरलेला, तरीही वाचकांच्या दृष्टीने सहज-सोप्या भाषेत अभिव्यक्त झालेला 'श्री शंभो-भारत' हा महाकाव्य-स्वरूप प्रेरणादायी ग्रंथ प्रत्येकाच्या संग्रही असायलाच हवा, असा आहे.