Goel Prakashan
The Go Giver (Marathi) | द गो गिव्हर
Regular price
Rs. 225.00
Free Shipping
द गो गिव्हर ही ज्यो या यशासाठी तळमळणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणाची कथा आहे. तो खऱ्या अर्थाने ‘मिळवायचंच' या गटातला असून अधूनमधून त्याला वाटतं की, तो जितक्या नेटाने कठोर परिश्रम करतो तितकी त्याची उद्दिष्टं त्याच्यापासून दूर जातात. एक दिवस, एका वाईट तिमाहीच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय पदरात पाडून घेण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू असताना तो गूढ वाटणाऱ्या पिण्डरचा सल्ला घेतो. हा पिण्डर आख्यायिका बनून राहिलेला सल्लागार असून त्याचे चाहते त्याला 'द चेअरमन' म्हणून ओळखतात. नंतरच्या आठवड्यात पिण्डर अशा काही 'गो गिव्हर्स'चा परिचय ज्योसमवेत करून देतो जे ज्योला देण्याच्या सामर्थ्याप्रति स्वतःला कसं जागवावं हे शिकवतात