Trading in the Zone (Marathi) | ट्रेडिंग इन द झोन
Trading in the Zone (Marathi) | ट्रेडिंग इन द झोन
Goel Prakashan

Trading in the Zone (Marathi) | ट्रेडिंग इन द झोन

Regular price Rs. 270.00 Sale price Rs. 299.00 Unit price per
Free Shipping
तुम्हाला शेअर बाजाराबद्दल भरपूर माहिती असेल! तुम्हाला कदाचित शेअर बाजारातील महत्त्वपूर्ण खेळाडू ज्ञात असतील! शेअर कधी खरेदी करावेत आणि कधी विकावेत याचे ज्ञान देखील असेल! बाजारातील स्थिती-गती नेमकेपणाने माहिती आहे, असे तुम्हाला वाटत असेल! पण तुम्हाला तुमची स्वतःची ओळख आहे का?
 
खूप मुरलेले शेअर ट्रेडर्सदेखील काही वेळा त्यांच्या नकारात्मक विचारप्रणालीमुळे चुकीचे निर्णय घेतात. मानसिक असक्षमतेमुळे परिपूर्ण माहिती असून देखील ते त्यांच्या योजना यशस्वीरित्या राबवू शकत नाहीत. अती आत्मविश्वासामुळे ते शेअर बाजाराबद्दल चुकीच्या समजूती मनात विकसित करतात. परिणामतः मोठ्या तोट्याला ते सामोरे जातात.
मार्क डग्लस, अध्यक्ष ट्रेडिंग बिहेविअर डायनॅमिक्स या त्यांच्या कंपनीद्वारे गेली वीस वर्षे शेअर ट्रेडर्समध्ये योग्य मानसिकता विकसित करीत आहेत. एक प्रशिक्षक म्हणून ते त्यांच्यात आत्मविश्वास, शिस्त व अजिंक्यतेच्या विचारधारा रुजवत आहेत. शेअर ट्रेडर्सची मानसिकता ही त्यांच्या बाजाराच्या विश्लेषणापेक्षा खूप महत्त्वाची आहे, असे मार्क यांना वाटते. यशस्वीतेच्या झोनमध्ये व्यापार करणे आणि बाजारातील विविध शक्यतांचा अभ्यास करणे हे मार्क डग्लस यांना खूप महत्त्वाचे वाटते.  


ट्रेडिंग इन द झोन मध्ये डग्लस, ट्रेडर्स सातत्याने फायदेशीर नसण्याची मूलभूत कारणे शोधून काढतात. ते ट्रेडर्सना खोलवर रुजलेल्या अयोग्य मानसिक सवयींवर मात करण्यास मदत करतात. डग्लस बाजारपेठेच्या मिथकांचा पर्दाफाश करतात. ट्रेडर्सना बाजारातील यादृच्छिक परिणामांच्या पलीकडे पाहण्यास, जोखमीची खरी वास्तविकता समजून घेण्यास आणि सर्व स्टॉक अनुमानांवर नियंत्रण ठेवणार्या अनिश्चिततेच्या तत्त्वाचे मार्गदर्शन करण्यास शिकवतात. ट्रेडिंग इन द झोन बाजाराला नवीन मानसिक परिमाणाची ओळख करून देतो. अभूतपूर्व नफ्यासाठी  ट्रेडिंग इन द झोनच्या शक्तीचा फायदा करून घ्या.

मार्क डग्लस हे १९९० मध्ये प्रकाशित झालेल्या ’द डिसिप्लिन्ड ट्रेडर : डेव्हलपिंग विनिंग अ‍ॅटिट्यूड्स’ या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी ’ट्रेडिंग सायकोलॉजी’ या संकल्पनेशी गुंतवणूक उद्योगाची ओळख करून दिली. मार्कने १९८२ मध्ये ट्रेडर्सना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आणि गुंतवणूक उद्योग, तसेच वैयक्तिक ट्रेडर्ससाठी ट्रेडिंग सायकॉलॉजी या विषयावर चर्चासत्र आणि प्रशिक्षण कार्यक्रम विकसित करणे सुरू ठेवले आहे. ते जगभरातील, तसेच अमेरिकेतील या विषयावरील चर्चासत्रांमध्ये  वक्ते म्हणून काम करत आहेत. ट्रेडर्सना सातत्याने यशस्वी कसे व्हायचे ह्याची शिकवण ते अविरतपणे देत आहेत. सध्या ते त्यांच्या तिसर्‍या पुस्तकावर काम करत असून, त्याबद्दलची माहिती तुम्ही त्यांच्या ुुु.ारीज्ञर्वेीसश्ररी.लेा या संकेतस्थळाच्या माध्यमातून घेऊ शकता।

Share this Product